मंडळातला कार्यकर्ता
काल कामानिमित्त पुण्यात गेलो होतो, सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची चाललेली धावपळ आपलाच बाप्पा सगळ्यात भारी असायला पाहिजे या दृष्टीने चालली चढाओढ सगळं चहाच्या सोबत पाहत होतो इतक्यात सोबत असणारा माझा मित्र बोला की काय पण असुदेत मात्र आपल्यातला कार्यकर्ता मेला नाही पाहिजे...
म्हटलं कसला भारी बोलास भावा, त्याच्या त्या वाक्याने ८ - ९ वर्षा पूर्वीचा काळ डोळ्यासमोर उभा राहिला.
तस आमचं गाव छोटसं आहे, निरा नदीच्या कुशीत आणि पुणे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर, जमतेम १०० - १५० उंबरठ्या च टापरेवाडी माझं गाव , जस समजतंय तस आमच्याकडे एक गाव एक गणपती.
इयत्ता 9 वी पासून मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता ,
कसले बेभान ,मंतरलेले दिवस होते ते. रात्र रात्र जागून पूर्ण केलेलं डोकोरेशन आणि गणपती जाण्याचा दिवस आला तरी आमची चाललेली तयारी एक वेळीच दुनिया होती...
१५ ऑगस्टला मिटिंग झाली की आमची तयारी सुरू व्हायची अध्यक्ष पद वैगरे आमच्या साठी नाममात्र फक्त आपला कार्यक्रम जोरात झाला पाहिजे एवढंच डोक्यात .
पैसे म्हणाल तर अगदी जेमतेम मात्र तेवढ्या पैशात पण मस्त कार्यक्रम करून दाखवून आम्ही च आमची पाठ थोपटून घ्यायचो .
आमचे उत्सव म्हणजे फक्त उत्सव नव्हता त्याला एक वैचारिक आधार होता , स्त्री समानता , पारंपरिकता,आधुनिकता यांचं मिश्रण त्यामध्ये होतं.
आयुष्यात व्यवस्थापन , नियोजन , व्यवहारिता आणि ऐकी यांचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणजे गणपती मंडळ याचा अनुभव आजही येतो..
त्या १० दिवसात जे शिकलो ना ते कुठंच शिकायला नाही भेटला याचा कायम अभिमान आहे आणि शिवाय या माध्यमातून जे ऋणानुबंध जडले ते वेगळेच , हा बाप्पा येतो आणि सगळ्या गोष्टी लख्ख करून जातो...
पण हा कार्यकर्ता आज थोडा थंड पडलाय जबाबदारी , कामाचा व्याप यामुळे मंडळात असणारा हा कार्यकर्ता आज मंडळ बाहेर राहून फक्त विचारपूस करतोय याची खंत मनाला बेचैन करते पण पुन्हा वाटतं की कदाचित हे प्रयोजन असावं रूढी परंपरा एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित करण्याचे ..
आज बाप्पाच्या आगमनाच्या पूर्वसंध्येला याचा खूप जास्त अभिमान वाटतो की कुठे असलो तरी हा कार्यकर्ता जिवंत आहे....
बाप्पा तुझी कृपा दृष्टी कायम अशीच राहूदे....
वारसा विचारांचा उत्सव परंपरेचा
🤟🙏
ReplyDeleteThank u
Deleteजवळ जवळ 10 ते 15 वर्षाचा मागचा काळ आठवला आपल्यातला तो किडा अजूनही आहे म्हणायचं 👍👍👍👌👌👌
ReplyDelete🤣🤣🙏
Deleteखुप छान लिहिलं आहेस सुशांत
ReplyDeleteThank u Dada.
ReplyDelete