Posts

Showing posts from October, 2024

आता तरी थोडं शाहन व्हा राजहो

राजकारण , दुनियादारी, पक्ष , आंदोलनं, मोर्चे हे आपल्यासाठी नाही बाबाहो, आपण काल पण सर्वसामान्य होतो आज सर्वसामान्य आहोत आणि कदाचित उद्याही असू, कदाचित म्हणतोय ते एवढ्या साठी की जर आपण आतापण शहाणे नाही झालो तर आपण सर्वसामान्य पण असू का हा मोठा प्रश्न आहे..   कुणाच्याही घोषणा दिल्या तरी शेवटी भाकरी आपल्याच घरी , कोणी कोणच घर नाही चालवत मित्रांनो , राजकारण हा आपल्या समजला शापच जणू , करिअर घडवायच्या दिवसात आम्ही समाज घडवायला निघतो बर समाज म्हणजे कोण ओ आपणच ना म अगोदर स्वतःला घडवणं महत्वाचं नाही का ?   बर आपण मोर्चे करू मांडवली ते करणार आपण आंदोलन करू मंत्री पद त्यांच्या पोरांना भेटणार आपण झेंडे मिरवू रुबाब त्यांचा वाढणार, हे कुठं तरी थांबायला हवं असं नाही वाटत का ??   बर सरकारी नोकरीचा प्रश्न आला की तुम्ही आरक्षणाच भूत समोर आणता पण एक विसरता हे असताना ही स्पर्धा करणारे आहेतच की ,   एखादा धंदा कर म्हटलं की आपली सुरुवात कुठून तर,  द्या एखादी चांगली आयडिया  मग मी करतो ,  अरे  लेका अस कुठं असतंय का?? कस आहे ना भाऊ गोष्टींचं ना वेडं असाल पाहिजे मग गोष्टी ज...

सुभेदार

 सुभेदार सांगना कुठून आणलं ओ एवढं धैर्य घरात पोराच्या लग्नाची हळद फुटतं असताना तुम्ही रक्ताची रंगपंचमी खेळली कोंढण्यावर... सुभेदार ! वरबाप म्हणून राजगडावर गेला आणि मोहिमेचा विडा घेऊन आला ... कस जमलं ओ तुम्हाला ? आधी लगीन कोंढण्याचं आणि मग रायबाचं अस छाती ठोकून  सांगायला ! माहिती होत उदयभान  काळ बनून बसलाय तिकडं पण सुभेदार तुम्ही मंजे वाघच की ! कोंढण्यावर निश्चयाची तलवार आणि काळजाची ढाल करून लढलात, काळी अभेद्य कातळ पण सुभेदार तुमच्या पुढ कायच अशक्य नाही ओ, त्या कातलीळा पण पायाखाली आणलं , सुभेदार कस जमलं निर्जीव कड्याला पण आपलंसं करायला... सुभेदार तुमची बाकी गोष्टच न्यारी, तुम्ही काय , शेलार मामा काय अन ते आपलं सूर्याजी तुमचीच सावली बर का, हिकडं तुम्ही पडला तर बहाद्दर दोर कापून आला,  काय म्हणावं त्यांना इकडे भाऊ पडला पण मोहीम फत्ते झाली पाहिजे ही जिद्द, सुभेदार कोणच्या मातीचे ओ तुम्ही.. लढला काय ,जिंकला काय अन कोंढण्याचा सिंहगड केला काय ?? सुभेदार स्वाभिमनाची मशाल, दोस्तीची मिशाल ,कर्तव्यचं तोरण,पराक्रमाची गुढी , विश्वासाचं सार्थक  काय काय नाही देऊन गेलात तुम्ही.....