Posts

Showing posts from September, 2024

मंडळातला कार्यकर्ता

काल कामानिमित्त पुण्यात गेलो होतो, सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची चाललेली धावपळ आपलाच बाप्पा सगळ्यात भारी असायला पाहिजे या दृष्टीने चालली चढाओढ सगळं चहाच्या सोबत पाहत होतो इतक्यात  सोबत असणारा माझा मित्र बोला की काय पण असुदेत मात्र  आपल्यातला कार्यकर्ता मेला नाही पाहिजे ...    म्हटलं कसला भारी बोलास भावा,  त्याच्या त्या वाक्याने ८ - ९ वर्षा पूर्वीचा काळ डोळ्यासमोर उभा राहिला. तस आमचं गाव छोटसं आहे, निरा नदीच्या कुशीत आणि पुणे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर, जमतेम १०० - १५० उंबरठ्या च  टापरेवाडी माझं गाव ,  जस समजतंय तस आमच्याकडे एक गाव एक गणपती.    इयत्ता 9 वी पासून मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता ,   कसले बेभान ,मंतरलेले दिवस होते ते. रात्र रात्र जागून पूर्ण केलेलं डोकोरेशन आणि गणपती जाण्याचा दिवस आला तरी आमची चाललेली तयारी एक वेळीच दुनिया होती...    १५ ऑगस्टला मिटिंग झाली की आमची तयारी सुरू व्हायची अध्यक्ष पद वैगरे आमच्या साठी नाममात्र फक्त आपला कार्यक्रम जोरात झाला पाहिजे  एवढंच डोक्यात . पैसे म्हणाल तर अगदी जेमतेम मात्र तेवढ्य...