पाऊसकाळ कमी झालाय

 हल्ली सगळेच म्हणतायेत पाऊस काळ कमी झालाय,

मी म्हणतो माणुस तरी कुठं हल्ली माणूस राहिलाय

पावसाने बिचाऱ्याने तरी किती दिवस निःस्वार्थ बरसाव स्वार्थी माणसासाठी ??

तुम्हीच सांगा कुठं उरलेत कुठे डोंगर झाडी ढग अडवण्यासाठी

     हरवत चाली मातीची ओल आणि ओढ

     हरवलेल्या माणुसकी सारखी,

     इथे कोणच नाही कोणाचं आणि नाही कोणाला कोणाची फिकर

     म  सांगाना तिथंच कशी असें पावसाची हळवी सर...

थोडे बहुत आपण पण नाती गोती जपायला पडतोय कमी

म कुठं चुकलं पावसाचं जर त्यानेही पाऊसकाळ केला कमी

आभार माना शेतकऱ्यांचं आणि वारकऱ्यांचे ज्यांच्यामुळे माणुसकी बाकी आहे थोडी,

नाहीतर कसली ईर्षा कसली श्रीमंती कधीच पार झाली असती आपली होडी....

      पहा थोडं विचार करून ,

जमतंय का माणूस म्हणून जगायला , माणुसकीचे ढग पुन्हा नात्यानं मध्ये पेरायला,

जमलंच थोडे डोंगर आणि झाडी राखू

पडेल पाऊस पहिल्या सारखा आपण पण पहिल्या सारख वागू ,आपण पण पहिल्या सारख वागू।।

                                               ✍️ सुशांत


Comments

  1. सुशांत फार छान आणि संवेदनशील लिहितोयस, असाच लिहिता रहा, लिहिण्यामुळे माणसाची त्या त्या विषयावरची वैचारिक प्रक्रिया सतत सुरु राहते. आणखी तुझ्याकडून असेच वाचायला मिळेल

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आता तरी थोडं शाहन व्हा राजहो

सुभेदार