आता तरी थोडं शाहन व्हा राजहो
राजकारण , दुनियादारी, पक्ष , आंदोलनं, मोर्चे हे आपल्यासाठी नाही बाबाहो,
आपण काल पण सर्वसामान्य होतो आज सर्वसामान्य आहोत आणि कदाचित उद्याही असू,
कदाचित म्हणतोय ते एवढ्या साठी की जर आपण आतापण शहाणे नाही झालो तर आपण सर्वसामान्य पण असू का हा मोठा प्रश्न आहे..
कुणाच्याही घोषणा दिल्या तरी शेवटी भाकरी आपल्याच घरी , कोणी कोणच घर नाही चालवत मित्रांनो ,
राजकारण हा आपल्या समजला शापच जणू , करिअर घडवायच्या दिवसात आम्ही समाज घडवायला निघतो बर समाज म्हणजे कोण ओ आपणच ना म अगोदर स्वतःला घडवणं महत्वाचं नाही का ?
बर आपण मोर्चे करू मांडवली ते करणार
आपण आंदोलन करू मंत्री पद त्यांच्या पोरांना भेटणार
आपण झेंडे मिरवू रुबाब त्यांचा वाढणार, हे कुठं तरी थांबायला हवं असं नाही वाटत का ??
बर सरकारी नोकरीचा प्रश्न आला की तुम्ही आरक्षणाच भूत समोर आणता पण एक विसरता हे असताना ही स्पर्धा करणारे आहेतच की ,
एखादा धंदा कर म्हटलं की आपली सुरुवात कुठून तर,
द्या एखादी चांगली आयडिया मग मी करतो ,
अरे लेका अस कुठं असतंय का?? कस आहे ना भाऊ गोष्टींचं ना वेडं असाल पाहिजे मग गोष्टी जमतात पण आपलं मंजे कस आहे , दे हरी पलंगावरी..
बर आमच्या मागच्या पिढ्या आंदोलनं, मोर्चे , राजकीय पक्ष याच्या मागे लागून फेल गेल्या आणि आताची पिढी बैलगाडा शर्यत च्या मागे लागून जाणार अस वाटायला लागलं..
बर कस आहे आवड आणि वेसण यात आपली गल्लत होते , आवड म्हणून करा की बैलगाडा शर्यत पण आम्ही मंजे कस जहागीर घालवू पण थाट घालवणार नाही...
विचार करा राजाहो...अजुन पण आपण करियर मध्ये आर्ट्स कॉमर्स , सायन्स याच्या पलीकडे नाही गेलो...
अजून पण धंदा म्हटलं की वडापाव आणि चहा च्या पलीकडे काही सुचत नाही (मी कोणत्या क्षेत्राला कमी लेखत नाही पण कस असत ना की एखाद्या गोष्टीची मर्यादा असते ती समजयला हवी)
म्हणजे एक उदाहरण घ्या १९९९ - २००० पर्यंतचा काळ डीएड ने गाजवला आमचा सगळा समाज त्याच्या मागे लागला झालं तिकडे एवढे डीएड वाले झाले की सरकार म्हणाल एवढ्या लोकांना मास्तर म्हणून नोकरी नाही देऊ शकत ,,, म आला डिप्लोमा याने किलोने डिप्लोमा इंजिनिर्स झाले आमच्याकडे पण नोकरी म्हणाल तर अजून पण दुष्काळ....
हे फक्त उदाहरण आहे मंजे एक गोष्ट लक्षात घ्या की आपण एखाद्या क्षेत्रात मध्ये जातोय पण ट्रेंड संपण्याच्या वेळेत आणि म अडकतोय बेरोजगारी, गरिबीच्या चक्रात...
अजून पण आपण करिअर तेवढ सिरीयसली घेताना दिसत नाही तुमचं काय माझं पण तेच आहे पण पुढच्याला ठेस मागचा शहाणा म्हणून हा लेखन प्रपंच...
बर त्यातही मोठी चूक मंजे आपण ग्रामीण भागात जन्माला आलो हा आता चुकच म्हणावी 3 कारण ग्रामीण भागात जन्म घेऊन काहीतरी भारी अजून आपण केलंच नाही ना ??
पहा जमलं तर थोडा विचार करून, upsc , mpsc , CA , IIT , Medical , research,NDA, SSB , CDS , या सारख्या आणि अजून वेगळ्या क्षेत्रात काही करता येत का??
बाकी शेवटी एवढंच म्हणावं वाटतं , तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार ।।।
✍️ सुशांत गणपत टापरे
Comments
Post a Comment