आता तरी थोडं शाहन व्हा राजहो
राजकारण , दुनियादारी, पक्ष , आंदोलनं, मोर्चे हे आपल्यासाठी नाही बाबाहो, आपण काल पण सर्वसामान्य होतो आज सर्वसामान्य आहोत आणि कदाचित उद्याही असू, कदाचित म्हणतोय ते एवढ्या साठी की जर आपण आतापण शहाणे नाही झालो तर आपण सर्वसामान्य पण असू का हा मोठा प्रश्न आहे.. कुणाच्याही घोषणा दिल्या तरी शेवटी भाकरी आपल्याच घरी , कोणी कोणच घर नाही चालवत मित्रांनो , राजकारण हा आपल्या समजला शापच जणू , करिअर घडवायच्या दिवसात आम्ही समाज घडवायला निघतो बर समाज म्हणजे कोण ओ आपणच ना म अगोदर स्वतःला घडवणं महत्वाचं नाही का ? बर आपण मोर्चे करू मांडवली ते करणार आपण आंदोलन करू मंत्री पद त्यांच्या पोरांना भेटणार आपण झेंडे मिरवू रुबाब त्यांचा वाढणार, हे कुठं तरी थांबायला हवं असं नाही वाटत का ?? बर सरकारी नोकरीचा प्रश्न आला की तुम्ही आरक्षणाच भूत समोर आणता पण एक विसरता हे असताना ही स्पर्धा करणारे आहेतच की , एखादा धंदा कर म्हटलं की आपली सुरुवात कुठून तर, द्या एखादी चांगली आयडिया मग मी करतो , अरे लेका अस कुठं असतंय का?? कस आहे ना भाऊ गोष्टींचं ना वेडं असाल पाहिजे मग गोष्टी ज...