सुभेदार
सुभेदार सांगना कुठून आणलं ओ एवढं धैर्य
घरात पोराच्या लग्नाची हळद फुटतं असताना
तुम्ही रक्ताची रंगपंचमी खेळली कोंढण्यावर...
सुभेदार !
वरबाप म्हणून राजगडावर गेला आणि मोहिमेचा विडा घेऊन आला ...
कस जमलं ओ तुम्हाला ?
आधी लगीन कोंढण्याचं आणि मग रायबाचं अस छाती ठोकून सांगायला !
माहिती होत उदयभान काळ बनून बसलाय तिकडं पण सुभेदार तुम्ही मंजे वाघच की !
कोंढण्यावर निश्चयाची तलवार आणि काळजाची ढाल करून लढलात,
काळी अभेद्य कातळ पण सुभेदार तुमच्या पुढ कायच अशक्य नाही ओ,
त्या कातलीळा पण पायाखाली आणलं ,
सुभेदार कस जमलं निर्जीव कड्याला पण आपलंसं करायला...
सुभेदार तुमची बाकी गोष्टच न्यारी,
तुम्ही काय , शेलार मामा काय अन ते आपलं सूर्याजी तुमचीच सावली बर का,
हिकडं तुम्ही पडला तर बहाद्दर दोर कापून आला,
काय म्हणावं त्यांना इकडे भाऊ पडला पण मोहीम फत्ते झाली पाहिजे ही जिद्द,
सुभेदार कोणच्या मातीचे ओ तुम्ही..
लढला काय ,जिंकला काय अन कोंढण्याचा सिंहगड केला काय ??
सुभेदार स्वाभिमनाची मशाल, दोस्तीची मिशाल ,कर्तव्यचं तोरण,पराक्रमाची गुढी , विश्वासाचं सार्थक काय काय नाही देऊन गेलात तुम्ही....
सुभेदार अमर अमर झालात तुम्ही...
शतशः प्रणाम सुभेदार...
✍️लब्जे-ए-Suशांत
( सुशांत टापरे)
Comments
Post a Comment