सगळं आपल्या कवेत असतं 👍

सगळं आपल्या कवेत असत आपलं फक्त लक्ष नसत

हारनं , जिंकणं, पडणं , उठणं, रडणं , हसणं..

सगळं सगळं म्हणजे अगदी सगळ...

बस थोडं वेगळं जगता , राहता आणि विचार करता आलं पाहिजे...

पहिल्यांदा चालताना सगळेच पडतात,                    म काय कोणी चालायचचं  शिकत नाही का ?

आपण उगाच आधार शोधात बसतो आणि इथेच आपली गल्लत होते..

कारण आधारासोबत सहानुभूती येते आणि सहानुभुती सोबत सुरक्षितता आणि हीच सुरक्षितता म आपल्याला आपल्या चौकटी बाहेर पडू देत नाही आणि जोवर आपण तिच्या बाहेर पडत नाही तोवर जे पाहिजे ते आणि जस पाहिजे तस मिळवणं अवघड आहे..

   ठेवा ना प्रयत्नांवर विश्वास , पडलात न तर असुदेत काय फरक पडतो हीच तर सुरुवात आहे रूजण्याची करण झाडालाही आकाशाशी स्पर्धा करायला बी म्हणून या मातीत गाडून घ्यावं लागतच की ...

शेवटी आपण तर माणूस आहोत , विचार करण्याची नैसर्गिक दैवी देणगी आपल्याला अगदी मोफत मिळाली आहे , फक्त गरज आहे ती त्याचा योग्य उपयोग करायची..

अपयश आले म्हणून हताश होत असाल तर ठीक आहे , व्हायला पण पाहिजे पण हताश होऊन प्रयत्न सोडत आसताल तर म बाकी तुमचं चुकतंय...

अपयश येत तेव्हा ते कदाचित येणाऱ यश तुम्ही पेलू शकता का हे पाहण्याची चाचपणी असेल...

तेव्हा मित्रा खचू नको

धीर सोडू नको 

येणार तुझा पण दिवस

तू फक्त प्रयत्नांवर विश्वास ठेवून जगणं सोडू नको...


  ✍️ सुशांत टापरे 

 

Comments

Popular posts from this blog

आता तरी थोडं शाहन व्हा राजहो

पाऊसकाळ कमी झालाय

सुभेदार