Posts

मंडळातला कार्यकर्ता

काल कामानिमित्त पुण्यात गेलो होतो, सगळीकडे बाप्पाच्या आगमनाची चाललेली धावपळ आपलाच बाप्पा सगळ्यात भारी असायला पाहिजे या दृष्टीने चालली चढाओढ सगळं चहाच्या सोबत पाहत होतो इतक्यात  सोबत असणारा माझा मित्र बोला की काय पण असुदेत मात्र  आपल्यातला कार्यकर्ता मेला नाही पाहिजे ...    म्हटलं कसला भारी बोलास भावा,  त्याच्या त्या वाक्याने ८ - ९ वर्षा पूर्वीचा काळ डोळ्यासमोर उभा राहिला. तस आमचं गाव छोटसं आहे, निरा नदीच्या कुशीत आणि पुणे सातारा जिल्ह्याच्या सीमेवर, जमतेम १०० - १५० उंबरठ्या च  टापरेवाडी माझं गाव ,  जस समजतंय तस आमच्याकडे एक गाव एक गणपती.    इयत्ता 9 वी पासून मंडळाचा सक्रिय कार्यकर्ता कसले बेभान दिवस होते ते रात्र रात्र जागून पूर्ण केलेलं डोकोरेशन आणि गणपती जाण्याचा दिवस आला तरी आमची चाललेली तयारी एक वेळीच दुनिया... १५ ऑगस्टला मिटिंग झाली की आमची तयारी सुरू व्हयची अध्यक्ष पद वैगरे आमच्या साठी नाममात्र फक्त आपला कार्यक्रम जोरात झाला पाहिजे  एवढंच डोक्यात . पैसे म्हणाल तर अगदी जेमतेम मात्र तेवढ्या पैशात पण मस्त कार्यक्रम करून दाखवून आम्ही च आमची पाठ थोपटून घ्याचो .   आमचे उत्सव म्हणजे फक

पाऊसकाळ कमी झालाय

 हल्ली सगळेच म्हणतायेत पाऊस काळ कमी झालाय, मी म्हणतो माणुस तरी कुठं हल्ली माणूस राहिलाय पावसाने बिचाऱ्याने तरी किती दिवस निःस्वार्थ बरसाव स्वार्थी माणसासाठी ?? तुम्हीच सांगा कुठं उरलेत कुठे डोंगर झाडी ढग अडवण्यासाठी      हरवत चाली मातीची ओल आणि ओढ      हरवलेल्या माणुसकी सारखी,      इथे कोणच नाही कोणाचं आणि नाही कोणाला कोणाची फिकर      म  सांगाना तिथंच कशी असें पावसाची हळवी सर... थोडे बहुत आपण पण नाती गोती जपायला पडतोय कमी म कुठं चुकलं पावसाचं जर त्यानेही पाऊसकाळ केला कमी आभार माना शेतकऱ्यांचं आणि वारकऱ्यांचे ज्यांच्यामुळे माणुसकी बाकी आहे थोडी, नाहीतर कसली ईर्षा कसली श्रीमंती कधीच पार झाली असती आपली होडी....       पहा थोडं विचार करून , जमतंय का माणूस म्हणून जगायला , माणुसकीचे ढग पुन्हा नात्यानं मध्ये पेरायला, जमलंच थोडे डोंगर आणि झाडी राखू पडेल पाऊस पहिल्या सारखा आपण पण पहिल्या सारख वागू ,आपण पण पहिल्या सारख वागू।।                                                ✍️ सुशांत

सगळं आपल्या कवेत असतं 👍

सगळं आपल्या कवेत असत आपलं फक्त लक्ष नसत हारनं , जिंकणं, पडणं , उठणं, रडणं , हसणं.. सगळं सगळं म्हणजे अगदी सगळ... बस थोडं वेगळं जगता , राहता आणि विचार करता आलं पाहिजे... पहिल्यांदा चालताना सगळेच पडतात,                    म काय कोणी चालायचचं  शिकत नाही का ? आपण उगाच आधार शोधात बसतो आणि इथेच आपली गल्लत होते.. कारण आधारासोबत सहानुभूती येते आणि सहानुभुती सोबत सुरक्षितता आणि हीच सुरक्षितता म आपल्याला आपल्या चौकटी बाहेर पडू देत नाही आणि जोवर आपण तिच्या बाहेर पडत नाही तोवर जे पाहिजे ते आणि जस पाहिजे तस मिळवणं अवघड आहे..    ठेवा ना प्रयत्नांवर विश्वास , पडलात न तर असुदेत काय फरक पडतो हीच तर सुरुवात आहे रूजण्याची करण झाडालाही आकाशाशी स्पर्धा करायला बी म्हणून या मातीत गाडून घ्यावं लागतच की ... शेवटी आपण तर माणूस आहोत , विचार करण्याची नैसर्गिक दैवी देणगी आपल्याला अगदी मोफत मिळाली आहे , फक्त गरज आहे ती त्याचा योग्य उपयोग करायची.. अपयश आले म्हणून हताश होत असाल तर ठीक आहे , व्हायला पण पाहिजे पण हताश होऊन प्रयत्न सोडत आसताल तर म बाकी तुमचं चुकतंय... अपयश येत तेव्हा ते कदाचित येणाऱ यश तुम्ही पेलू शकता क

आपलेपणाचे ढग

अथांग भरलेल्या आकाशात , आपले पणाचे  ढग दाटून यायला हवेत ...  कोणीच नसतं कोणाचं हे भ्रम आता तुटायला हवेत ....             बरसून द्यावं गैरसमजांच्या सरिंना , रुसव्याना  आणि आपलसं करावं दुरावलेल्या आपल्याना .... आयुष्य जगण्याची हि पण एक कला आहे कोणी नसला आपलं तरी आपण सर्वांचे आहोत यात एक वेगळीच मजा आहे ...  शेवटी पुन्हा एकदा आकाशात आपले पणाचे ढग  दाटून यायला हवेत ... ✍️ सुशांत